जे शिक्षण ‘स्व’ ओळख करून देऊ शकत नाही ते कुचकामी

0

शहादा। लिहीता वाचता येण ह्या तांत्रिक बाबी आहेत. फक्त लेखन वाचन करता येण म्हणजे शिक्षण नव्हे. सद्यस्थितीत जगण्याचा आणि शिक्षणाचा कुठलाच संबंध नसल्याचे दिसून येत आहे. जे शिक्षण व्याक्तीला स्वतःची ओखळ करून देवू शकत नाही ते कुचकामी आहे.

जागतिकीकरणाच्या पार्श्‍वभूमीवर मानवला मानवी चेहरा व जीवन देणार्‍या शिक्षणाची गरज आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत व पत्रकार उत्तम कांबळे यांनी व्यक्त केले. ते श्री. पी. के. आण्णा फाऊंडेशनच्यावतीने आयोजित पुरूषोत्तम व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफतांना जागतिकीकरण व शिक्षण या विषयांवर आपले मत मांडत होते.

खाजगीकरण, जागतिकीकरणावर मार्गदर्शन
पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाच्या सरदार पटेल सभागृहात झालेल्या कार्यक्रमात मंडळाचे उपाध्यक्ष किशोर पाटील, समन्वयक प्राचार्य मकरंद पाटील, रमाकांत पाटील, लियाकत आली सैय्यद, प्रा. संजय जाधव, अरविंद कुवर, अ‍ॅड. जसराज संचेती, हैदरअली नुराणी आदी उपस्थित होते. खाजगीकरण, स्वांतत्र्योत्तर शिक्षण पद्धती, जागतिकीकरण याबाबत उत्तम कांबळे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी नायब तहसिलदार डॉ. उल्हास देवरे, ज्येष्ठ नागरिक संघाचे डी. एच. पाटील, अनिसचे राज्य सचिव विनायक सावळे, डॉ. बी. डी. पटेल, रिपाईचे अनिल कुवर, कॉ. सुनील गायकवाड, तात्याजी पवार, लोटनराव धोबी, मुख्याध्यापक संघाचे जयदेव पाटील, अ‍ॅड. गोविंद पाटील आदी उपस्थित होत. सूत्रसंचालन व आभार प्रा. विजय प्रकाश शर्मा यांनी मानले