पाचदिवसीय गणेशाचे विसर्जन; जय शिवाजी गणेश मंडळ उत्सवाचे केंद्रबिंदू
जैताणे । साक्री तालुक्रातील जैताणे येथील पाच दिवसीय गणराराचे विसर्जन करण्रात आले. साक्री तालुक्यातील जैताणे मोठे गाव आहे. रा ठिकाणी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. दडी मारलेल्रा पावसाचे पुनरागमन झाल्राने भाविक आनंदी होते. अखेर पाचव्रा दिवशी भावपूर्ण वातावरणात गणराराला निरोप देण्रात आला. जैताणे गावातील सर्वात जुने व प्रतीष्ठेचे ’जय शिवाजी गणेश मंडळ’ असुन गणेश उत्सवाचे केंद्रबिंदु मानले जाते. सर्वात आधी गनरायाच्या आगमनाची तयारी या मंडळापासुनच केली जाते. अतिशय उत्साही कार्यकर्ते त्यात लहानापासून ते अबाल वृद्धापर्यंत सर्वांचा सहभाग असतो.
गणरायाच्या जयघोषात निघाली मिरवणूक
शंकरद्वार इमारती जवळ गणरायाची स्थापना केली जाते. तेथूनच पाचव्या दिवशी विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते. पुढच्या चौकात जय भवानी गणेश मित्र मंडळाला सोबत घेऊन पुढे मार्ग काढला जातो, विसर्जन मिरवणुकित सामिल होण्याचा सर्वात पहिला मान याच जय शिवाजी गणेश मंडळाला दिला जातो त्यांच्या नंतर गावातील इतर मंडळे सामिल होतात. गुलाल उधळत गणरायाच्या नावाचा जयघोष करत साक्री रोडवरील जलाशयात विसर्जन करण्यात आले.