जैताणे येथे रस्ता काँक्रीटीकरण कामाचे उद्घाटन

0

जैताणे । ग्रामविकास राज्य मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दादा भुसे यांच्या ग्रामविकास विभागामार्फत लेखशीर्ष 2515 ग्रामिणविकास रस्ते योजनेअंतर्गत निजामपुर येथे जे.के.नगरसाठी कॉक्रींट रस्त्याचे कामाचे उद्घाटन करण्यात आले आहे. शिवसेना उपजिल्हाप्रमुख भुपेशभाई शहा, प्रवीण वाणी, त्रिलोक दवे यांच्या पाठपुराव्याने व शिवसेना साक्री तालुकाप्रमुख विशाल अनंतराव देसले यांच्या प्रयत्नातुन निजामपुर येथे जे.के.नगर येथे कॉक्रीट रस्त्यासाठी 5 लाखांचा निधी मंजुर झाला आहे. याकामाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख भुपेश शाह, शिवसेना साक्री तालुका प्रमुख विशाल अनंतराव देसले, उपतालुका प्रमुख प्रवीण वाणी, निजामपुर सरपंच प्रतिनिधी विजय राणे,सदस्य राजेंद्र देवरे,साक्री उपतालुकाप्रमुख भरत जोशी, धनराज भामरे, त्रिलोक दवे, पाडु गुरव, भैय्या गुरव, ज्ञानेश्‍वर गुरव, महेश खैरनार, दर्शन परदेशी, रवींद्र खैरनार, अर्जुन अहिरे, प्रशांत चव्हान, पप्पु धनगर, विशाल मराठे आदी शिवसैनिक पदाधिकारी व ग्रामस्त उपस्थित होते.