जैन अलर्ट ग्रुपतर्फे महावीर जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा

0

शिंदखेडा । शहरातील जैन अलर्ट ग्रुप ऑफ शिंदखेडातर्फे महावीर जयंतीनिमित्त निबंध स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत डॉ. सुरेश माणकलाल टाटिया यांनी प्रथम तर प्रा.चंद्रकांत देवीचंद डागा यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. येथील जैन स्थानकात ही स्पर्धा घेण्यात आली. ‘आजच्या काळात जैन सिद्धांताचे महत्व’ या विषयावर ही स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री संघचे अध्यक्ष खुशालचंद ओस्तवाल हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संजय लक्ष्मीलाल पारख, सजनराज कवाड, विजय कवाड, हुकमचंद गिडिया, सुवालाल कर्नावट, दिलीप टाटिया, सुगनचंद कर्नावट, मयूर ओस्तवाल, खुशाल पारख होते.

यशस्वितेसाठी यांनी घेतले परीश्रम
या स्पर्धेत तृतीय क्रमांक ओजस्विनी दिलीप कर्नावट, चतुर्थ मोनाली विरेंद्र कवाड यांची निवड करण्यात आली. विजेत्यांना रोख पारितोषिक देवून गौरविण्यात आले. विजयी स्पर्धाकांस उज्वल कर्नावट, सक्षम कर्नावट, रमेश कर्नावट, सपना कर्नावट, जागृती कर्नावट हे स्पर्धक ही सहभागी जाले होते. या स्पर्धेचे परीक्षण प्राविण पारख, अशोक राखेचा, यांनी केले तर वेळाअधिकारी म्हणून आयुष कर्नावट यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे प्रस्तविक ग्रुपचे अध्यक्ष कल्पेश जैन यांनी तर आभार प्रदर्शन अक्षय बाफना यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी सुमित पारख, कमलेश चोपडा, सचिन गुजराथी, निखिल रुणवाल यांनी परिश्रम केले.