जळगाव । अन्न आणि कृषी क्षेत्रातील निरंतर योगदानाबद्दल जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.चा दिल्लीतील क्वा एक्सलन्स फाऊंडेशनने 2017चा ‘एक्सलन्स वॉर्ड’ देऊन गौरव केला आहे. दिल्ली येथे झालेल्या शानदार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पर्यावरण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्या, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वंदना शिवा यांच्या हस्ते हा पुरस्कार कंपनीच्यावतीने विपणन विभागाचे उपाध्यक्ष प्रभात श्रीवास्तव यांनी स्वीकारला.
नाविण्याचा घेतलेला शोध…
पाणी, पर्यावरण, उर्जा निर्मिती, प्रदुषण नियंत्रण आदी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्या संस्थांचा गौरव दिल्लीतील क्वा फाऊंडेशनतर्फे केला जातो. जैन इरिगेशन सिस्टिम्सने अन्न आणि कृषी क्षेत्रात केलेली कामगिरी आणि त्यात ठेवलेले सातत्य, नाविन्याचा घेतलेला शोध या गोष्टींचा हा पुरस्कार देताना प्रामुख्याने विचार करण्यात आला. देशभरातून क्वा एक्सलन्सने विविध कंपन्या आणि संस्थांची माहिती घेतल्यानंतर जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. ची निवड केली. ही निवड करताना त्यांनी अन्न आणि कृषी क्षेत्रात कंपनीने केलेल्या कार्यावर अधिक भर दिला. जैन इरिगेशनला अन्न व कृषी क्षेत्रातील सशक्त विकासाकरिता एक्सलन्स अवार्ड मिळाला.
श्रीवास्तव यांंची उपस्थिती
नवीदिल्ली येथे 9 नोव्हेंबर 2017 ला वर्ल्ड क्वा काँग्रेसची कॉन्फरन्स झाली. ‘जल आणि पर्यावरण सोल्युशन्स : कटींग अक्रॉस बॉर्डर्स’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित ही कॉन्फरन्स पार पडली. पर्यावरण प्रेमी, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वंदना शिवा या प्रमुख पाहुण्या होत्या. विपणन विभागाचे उपाध्यक्ष प्रभात श्रीवास्तव यांनी हा पुरस्कार स्वीकारला.