जळगाव। जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडच्या ‘ग्री-बायोटेक ग्रुप’ने केळीवर लिहिलेला रिसर्च पेपर ‘फ्लॉवरींग टाईम इन बनाना अ डे न्यूट्रल प्लँट’ या विषयावरील रिसर्च पेपर 19 जुलै रोजी नामांकित ब्रिटीश जर्नल नेचरमध्ये प्रसिद्ध झाला आहे. या माध्यमातून ‘जैन’ने केलेल्या संशोधनाला जगमान्यता मिळाली असून ही खान्देशवासियांसाठी अत्यंत अभिमानाची बाब मानली जात आहे.
‘जैन’चे उच्च तंत्रज्ञान : जैन इरिगेशनने केळी उत्पादक शेतकर्यांना त्यांच्या बांधावर कृषीक्षेत्रातील उच्च तंत्रज्ञान पोहोचवले आहे आणि ही कंपनी 70 दशलक्ष टिश्यू कल्चर केळीची रोपे केळी शेतकर्यांना विकली आहेत. तसेच जैन इरिगेशनने सूक्ष्म सिंचनाचे विकसित संच शेतकर्यांना विकते आहे. ही मूल्यवर्धन साखळी जैन इरिगेशन केळी शेतकर्यांकडून केळी विकत घेऊन पूर्ण करते. जैन इरिगेशन ह्या विकत घेतलेल्या केळ्यांवर प्रक्रिया करते व त्यांना निर्यातही करते. ह्या संशोधन पेपर्स नामांकित ब्रिटीश जर्नलमध्ये प्रसिद्ध होण्याच्या बहुमानामुळे केळी पिकाची सर्वसाधारण उत्पादकता आणि गुणवत्ता नक्कीच सुधारेल.
फ्लॉवरिंगमधील भूमिका सिध्द
शास्त्रज्ञांनी हे जाहीर केले की त्यांनी पहिल्यांदा एफटी जीन्स फॅमिलीच्या घटकांची डे न्यूट्रल केळ्यातील फ्लॉवरींग नियंत्रित करण्यातली भूमिका यशस्वीपणे सिद्ध केली. केळीचे हे फ्लॉवरींग/ फ्रुटिंग चक्र लांब आहे. उच्च तापमान असलेले उन्हाळे, थंड हिवाळे, दुष्काळ यासारख्या नकारात्मक परिणामांना संवेदनशील आहे. केळीच्या जीवनचक्रात या नकारात्मक परिणामांचा सामना करण्यासाठी फरक करायचा ठरवला तर त्यासाठी फ्लॉवरींगच्या मॉलेक्युलर शरीरविज्ञानशास्त्राचा अत्यंत सखोल अभ्यास करावाच लागेल. संशोधनात, 12 फ्लॉवरींग लोकस टी (एफटी), 2 ट्विन सिस्टर ऑफ एफटी(टीएसएफ)घटकांना केळीतून अलग काढले, त्यांची रचना व भाव याचा अभ्यास केला.
भाऊंना समर्पित
हे संशोधन जैन इरिगेशनच्या संशोधकांनी कंपनीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. भवरलाल जैन यांना समर्पित केले आहे. त्यांच्याच मार्गदर्शनामुळे जैन इरिगेशनने शेती-जैवतंत्रज्ञान क्षेत्रात शास्त्रिय कार्य सतत करीत असते. डॉ. जैन यांच्या या विषयातील आवडीने निश्चितच या क्षेत्रात भविष्यात संशोधन कार्यास प्रोत्साहन मिळेल आणि यामुळे नवीन दालन उघडले जाईल. हे आपल्या संशोधकांसाठी आणि शेतकर्यांसाठीही खूप फायदे देईल.