जैन इरिगेशनचा 2017 च्या सर्वसमावेशक व्यवसाय यादीत समावेश

0

जळगाव । जैन इरिगेशन सिस्टीम्स लि., या जगातील अग्रगण्य सिंचन कंपनीचा 2017 च्या सर्वसमावेशक व्यवसायांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. त्याबाबतचे प्रशस्तीपत्र इन्स्टिट्युट फॉर कंम्पिटिव्हनेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अमित कपूर व शेअर्ड व्हॅल्यू इनिशिएटीव्ह इंडियाचे कार्यकारी संचालक जस्टीन बाकुले यांनी कंपनीचे वरिष्ठ सहकारी अतिन त्यागी यांना दिले. दिल्ली येथे नुकतीच शेअर्ड व्हॅल्यू समीट आयोजली होती त्यात हा गौरव झाला. यासाठी भारतातील सर्वसमावेशक व्यवसायांच्या यादीतील आणि त्यांच्या व्यवसायातील संपूर्ण मूल्यवृद्धी साखळीत सामायिक मूल्य सहभाग निर्माण करणार्‍या भारतातील पहिल्या 50 कंपन्यांमध्ये जैन इरिगेशनचे नामांकन आहे. निती आयोगाचे सदस्य प्रा.रमेश चंद यांनी समारंभात यादी जाहीर केली.

वैविध्यपूर्ण उद्योग
या यादीत वैविध्यपूर्ण उद्योगांच्या संचातील कंपन्यांचा समावेश केला आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय उदयोग व व्यापार मंत्री सुरेश प्रभू होते. हॉर्वर्ड बिझनेस स्कूलचे प्रो. मायकेल इ पोर्टर यांच्या प्रेरणेतून द शेअर्ड व्हॅल्यू इनिशिएटीव्ह, इंडिया स्थापन झाली. प्रो. पोर्टर हे अद्ययावत धोरण या विषयाचे भिष्मपितामह आणि मूल्यवृद्धीतील सहभाग आणि त्याचे व्यवसाय धोरण आणि सार्वजनिक धोरण यातील एकीकरणाचे तज्ज्ञ म्हणून ख्याती आहे.

अधिकारी उद्योजक उपस्थित
सामाजिक समस्या आणि त्यावरील आव्हानांचा सामने करण्याचे उपाय, पुढाकार आणि नावीन्यपूर्ण पायरीतील शाश्‍वतता इ. जैन इरिगेशनची ह्या 50 भारतीय कंपन्यांत निवड झाली. केंद्रीय उदयोग आणि व्यापार मंत्री सुरेश प्रभू यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे या समिटमध्ये भाषण केले. प्रो. रमेश चंद, राजीवकुमार गुप्ता यांनी देखील उपस्थितांशी संवाद साधला. सुरेश प्रभू यांना देखील ही यादी समारंभात दिली गेली. या कार्यक्रमास अनेक उद्योगांचे वरीष्ठ अधिकारी व उद्योजक उपस्थित होते.

तीन प्रकारे संधी
व्यवसाय मूल्यवृद्धीतील सहभागासाठी संधींना तीन प्रकारे निर्माण करता येते. पहिला प्रकार म्हणजे उत्पादने आणि बाजारपेठा यांचा समेट (पुनर्विचार), दुसरा प्रकार – संपूर्ण मूल्य साखळीमधील उत्पादकतेची नवीन व्याख्या करणे आणि तिसरा – स्थानिक समूहाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणे. सर्वसमावेशक व्यवसायांची यादी 2017 मध्ये या तीन प्रकारांना उत्तेजन देऊन काम करणार्‍या कंपन्यांचाच समावेश असतो.