जळगाव । जैनइरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडच्या एकत्रित आणि स्वतंत्र अशा चौथ्या तिमाहीच्या वार्षिक निकालाला संचालक मंडळाने मंजुरी दिली. संचालक मंडळाची बैठक 24 मे रोजी जैन हिल्स येथे पार पडली. आर्थिक वर्षाचा विचार करता एकंदरीत सकारात्मक वाढ झालेली दिसते. चौथ्या तिमाहीतील आर्थिक वर्ष 2017 एकत्रित महसुलात 9.6 टक्क्यांनी तर संपूर्ण वर्षात टक्के वाढ झालेली आहे. सर्व सामान्य भागधारक आणि डीव्हीआर भागधारकांना 37.5 टक्के लाभांश देण्याबाबत संचालक मंडळाने शिफारस केली आहे.
कंपनीकडे देशांतर्गत 2107 कोटी रुपयांच्या ऑर्डर्स
स्वतंत्रपणे कंपनीचे निव्वळ कर्ज 1294.6कोटी रुपयांनी कमी करण्यात यश मिळवले एकत्रित कंपनीचे निव्वळ कर्ज 556.9 कोटी रुपयांनी तिमाही ते तिमाही आधारावर कमी झाले. कंपनीचा एकत्रित व्याज, घसारा कर पूर्व उत्पन्न वर्षात 11.2 टक्क्यांनी वाढुन 100.97 कोटी रुपये इतका झाला. कंपनीकडे देशांतर्गत 2107 कोटी रुपयांच्या ऑर्डर्स आहेत. कंपनीचा स्वतंत्र निव्वळ नफा (कर-पश्चात) चवथ्या तिमाहीचा 123.32 कोटी रुपये तर वार्षिक नफा 163.8 कोटी झाला. तर कंपनीचा एकत्रित वार्षिक नफा 176.2 कोटी झाला आहे. कंपनीचे चौथ्या तिमाहीचे स्वतंत्र उत्पन्न 119.92 कोटी रुपये तर वार्षिक उत्पन्न 156.86 कोटी रुपये इतके होते. कंपनीचा एकत्रित उत्पन्न 44.35 कोटी रुपये आणि वार्षिक उत्पन्न 94.02 कोटी रुपये होते. निव्वळ विक्री स्वतंत्र चौथ्या तिमाहीत 1330.08 कोटी तर वार्षिक 3863.95 कोटी रुपये इतकी होती. कंपनीची एकत्रित निव्वळ विक्री चौथ्या तिमाहीत 2286.55 कोटी तर वार्षिक 6939.32 कोटी रुपये झाली. दरम्यान, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी कंपनीची संपूर्ण उलाढाल पहिल्यांदाच 7 हजार कोटी रुपयांवर गेली आहे. कंपनीच्या हातात भरपूर ऑर्डर्स असल्यामुळे सन 2018 हे वर्ष नक्कीच चांगल्या वाढीचे जाईल, अशी आशा व्यक्त केली आहे.