जैन इरिगेशनतर्फे 1 लाख घरांपर्यंत कोरोना माहिती पुस्तिकेचे वितरण सुरु

0

जळगाव। कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन निर्देशित माहिती पुस्तिकेचे जळगाव शहरात 30 मार्चपासून वितरण सुरु झाले. जैन इरिगेशन सिस्टिम्स् लि. व भवरलाल अँड कांताबाई जैन फौंडेशनने ही मार्गदर्शक माहिती पुस्तिका जळगाव शहरासाठी एक लाख पुस्तिका छापून दिलेल्या असून या पुस्तिका प्रत्येक घरोघरी व्यक्तीगत पातळीवर पोहोचविण्यात येत आहे. या आजारासंदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (सिव्हिल) 0257-2226642 (132) कोरोना कक्ष यावर संपर्क साधावा. आतापर्यंत शहरातील विविध परिसरात घरो-घरी 36हजार पुस्तके वितरित करण्यात आली आहेत. उर्वरित पुस्तके पुढील काही दिवसांमध्ये वितरित करण्यात येणार आहे.याकामी जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, मनपा आयुक्त सतिष कुळकर्णी, जैन इरिगेशन सिस्टिम्स् लि. चे चेअरमन अशोक जैन व मनपा मुख्य लेखा परिक्षक संतोष वाहुळे यांचे सहकार्य लाभत आहे. तसेच माहिती पुस्तिकेच्या वितरण व्यवस्थेसाठी शहरातील विविध सेवाभावी संस्था व व्यक्तींचे योगदान लाभत आहे.