जळगाव । इमारत बांधकामात प्लंबिगची अनन्यसाधारण भूमिका असते. प्लंबरला मुळी किंमत नसते असा न्यूनगंड न ठेवता आपण प्लंबर आहोत याचा अभिमान प्रत्येकाने बाळगावा. असे महत्त्वपूर्ण विचार ‘वर्ल्ड प्लंबिंग डे’च्या कार्यक्रमात व्यक्त झाले. वर्ल्ड प्लंबिंग कौन्सिलतर्फे दरवर्षी 11 मार्चला वर्ल्ड प्लंबिंग डे साजरा करण्यात येतो. जैन हिल्स येथे हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करत ‘प्राऊड प्लंबर’ या लोगोचे देखील प्रकाशन करण्यात आले.
‘शाश्वत प्लंबिंग’ या विषयावर सादरीकरण
जैन इरिगेशन आणि महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशनच्या संयुक्तविद्यमाने ‘वर्ल्ड प्लंबिंग डे’ साजरा करण्यात आला. आरंभी जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशनचे अध्यक्ष दिनेश मिस्तरी, जैन इरिगेशनचे अनुप आगिवाल, हेमंत पेडणेकर, योगेश पाटील यांचे ‘शाश्वत प्लंबिंग’ या विषयावर सादरीकरण झाले. प्लंबिंग क्षेत्रातील ज्येष्ठ जयेश लापसिया, ज्ञानेश्वर सपकाळे (नाना प्लंबर), नईम प्लंबर यांनी आपले अनुभव कथन केले.
प्लंबिंग क्षेत्रातल्या व्यक्तींची
फ्लशच्यावेळी पाण्याचा मोठ्याने आवाज होतो या समस्येवर उपाय योजना झाली आहे अशी आनंदाची वार्ता उपस्थितांना सांगण्यात आली. या संदर्भात टेराईन एसडीपीतर्फे एसडब्ल्यूआर पाइप व फिटींग या नव्या उत्पादनाची ओळख करून देण्यात आली. त्याच प्रमाणे गरम व थंड पाण्यासाठी वापरण्यात येणारा उच्च प्रतिच्या पॉलिब्युटिलीन पाईपची ओळख व त्याचे वैशिष्ट्ये देखील सांगितले गेले. नजिकच्या काळात जैन इरिगेशन या दोन्ही उत्पादनांचे विपणन करेल अशी माहितीही दिली.