जैन इरिगेशनला पहिल्या तिमाहीत 85 कोटींचा नफा

0
भविष्यात कंपनीला निर्यात क्षेत्रात संधी – अनिल जैन
जळगाव । सूक्ष्म सिंचनातील देशातील सर्वात मोठ्या आणि जगातील दुसर्‍या क्रमांकाच्या जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड, या कंपनीने 2019 च्या पहिल्या तिमाहीचे लेखा परीक्षणाआधीचे एकल व एकिकृत निकाल सोमवारी 13 ऑगस्ट 2018 रोजी मुंबई येथे बैठकीत जाहिर केले. यात उत्पन्न, विक्री तसेच करपश्‍चात नफा चांगला दिसत आहे, हाती असलेल्या मागण्या व भविष्यातील मागण्यांचा विचार करता चांगली प्रगती साध्य होईल, असा विश्‍वास जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान मागील वर्षाच्या तिमाहीचा विचार करता यावर्षीच्या पहिल्या तिमाहीत एकत्रित कर व्याज घसारा 290.8 कोटी रूपयांपर्यंत उत्पन्नात वाढ होवून 85.1 कोटींचा नफा झाल्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान आम्हाला जून-2018 च्या आर्थिक तिमाहीचे परिणाम सांगतांना अतिशय आनंद होतो. अपेक्षेप्रमाणे सगळ्या विभागांनी वाढ नोंदविली आहे. देशातील सामाजिक व आर्थिक परिस्थिती आणि इतर क्षेत्रातील परिस्थितीमुळे सर्व विभागात वाढीच्या संधी मिळत आहेत. आतापर्यंत पाऊस चांगला राहिल्याने पुढील सहा महिन्यात सूक्ष्म सिंचन विभागाला वाढीची खूप मोठी संधी असल्याची प्रतिक्रिया देताना जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन म्हणाले.
जैन इरिगेशनच्या संचालक मंडळाच्या उपस्थितीत मुंबई येथे हे निकाल जाहिर करण्यात आले. यात मागच्या वर्षाच्यापेक्षा एकत्रित संपूर्ण उत्पन्न पहिल्या तिमाहीत 24.4 टक्क्यांनी वाढल्याची नोंद करण्यात आली. एकल संपुर्ण उत्पन्नात 17.5 टक्के वाढ झाली. पहिल्या तिमाहीत एकत्रित करव्याज घसारा (इबीआयडीटीए) पूर्व उत्पन्नात 16.6 टक्के वाढ होवून ते 290.8 कोटी रूपयांवर पोहचले. तर एकल करव्याज घसारापूर्व उत्पन्नात 26.3 टक्के वाढ होवून ते 190.3 कोटी रूपयांवर पोहचला आहे. एकत्रित करपश्‍चात नफा (पीएटी) 81.3 टक्क्यांनी वाढून तो 85.1 कोटींवर पोहचला. एकल करव्याज पश्‍चात नफा 6.6 टक्क्यांनी वाढून 43.6 कोटींवर पोहचला. हाती असलेल्या जागतिक ऑर्डर 4637.4 कोटी रूपयांवर आहेत. नुकतीच कंपनीने मध्यप्रदेश सरकारची सर्वात मोठी सूक्ष्मसिंचनाची ऑर्डर 975 कोटी रूपयांची मिळविली आहे. खनिज तेलाच्या किमती अस्थिर असूनही पाईप व्यवसायात नफाची टक्केवारी स्थिर राहिली. पाईपच्या मागणीत पायाभुत सुविधा क्षेत्रातुन सतत वाढ होत आहे यामुळे येणार्‍या काळात या विभागात चांगल्या संधी आहेत. शेतमाल प्रक्रीया विभागाने उत्तम  कामगिरी करित उत्पादन वाढविले यामुळे उत्पन्नात सुध्दा वाढ नोंदविली आहे. या हंगामात कंपनीने विक्रमी शेतमालावर प्रक्रिया केली आहे.