जैन इरिगेशनला विदर्भातील एकात्मिक सूक्ष्म सिंचन प्रकल्पाची 239 कोटीची ऑर्डर

0

जळगाव : जगातील अग्रगण्य सिंचन कंपनी जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमीटेडला विदर्भातील एकात्मिक सूक्ष्मसिंचन प्रकल्पाची 239.17 कोटी रूपयांची ऑर्डर मिळाली. ई-टेंडरींग प्रक्रियेतून ही ऑर्डर प्राप्त झाली. वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात हा प्रकल्प कार्यान्वीत होईल. प्रकल्पातुन 20 हजार 748 एकर क्षेत्र ओलीताखाली येणार असून त्याचा लाभ 10 हजारहून अधिक शेतकर्‍यांना होणार आहे. हा प्रकल्प 24 महिन्यात पूर्ण करावयाचा आहे.

प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये
या प्रकल्पाची लोअर वर्धा प्रकल्पातील जलाशयातील पाण्याची उचल करून ते प्रत्येक शेतकर्‍याच्या बांधापर्यंत ऑनफार्म सूक्ष्म सिंचन (ठिबक/तुषार) च्या मदतीने पोहोचवले जाईल. जैन इरिगेशन ईपीसी, टर्नकी कंत्राटात पुढील कामे पूर्ण करेल. यात प्रकल्पाच्या उभारणीच्या दृष्टीने सगळ्या प्रकारची पाहणी, संपूर्ण प्रणाली, रचना, डिझाईन, संबंधित संस्थांची मंजूरी याचे नियोजन. अ‍ॅप्रोच चॅनेल, पंपहाऊस आणि त्याचे घटक, नियंत्रण कक्ष, अंतर्गत रस्ते, वॉल कंपाऊंट आणि स्टीलचे छोटे प्रवेशद्वार याचे बांधकाम केले जाईल आदी वैशिष्ट्ये आहेत. या प्रकल्पाची 5 वर्षांपर्यंतची देखभालीची जबाबदारी कंपनीची राहणार आहे.

शाश्‍वत शेतीचा मार्ग
विदर्भातील शेतीची सद्यस्थिती पाहता शेतकर्‍यांच्या विकासासाठी अनेक सिंचन प्रकल्प उभारण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. काही प्रकल्पांच्या माध्यमातून मर्यादित शेतजमीन सिंचनाखाली आली आहे. उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम काटेकोर वापर व्हावा त्यासाठी अत्याधुनिक सिंचन तंत्रज्ञान वापरणे आवश्यक आहे. यासाठी नागपूर येथिल विदर्भ डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनद्वारे ‘स्त्रोतापासून थेट मुळापर्यंत’ (रिसोर्स टू रूट) या संकल्पनेवर आधारित ‘हर खेत को पानी’ हा प्रकल्प राबविला जात आहे. याप्रकल्पात सुमारे 20 हजार 748 एकर शेतजमीन ओलीताखाली येईल. हा स्वयंचलित सिंचन प्रकल्प असून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना मार्गदर्शक तत्त्वावर आधारीत आहे. पाण्यासाठी पाईप वितरण जाळे उभारण्यात येईल. त्यामुळे ‘हर खेत को पानी’ प्रत्यक्षात येईल. तसेच या प्रकल्पातील ऑनफार्म सूक्ष्मसिंचन प्रणालीमुळे ‘पाणी थेंबाने, पीक जोमाने’ या जैन इरिगेशनच्या ब्रिद वाक्यानुसार शेतीची उत्पादकता वाढेल तसेच शेतकर्‍यांना शाश्‍वत शेतीचा मार्ग गवसेल.

या प्रकल्पाच्या माध्यमातुन पाण्याचा अत्यंत कार्यक्षमपणे उपयोग साध्य होईल. विदर्भातील या प्रकल्प परिसरात सध्या 35 टक्क्यावरून 90 टक्के इतका कार्यक्षम पाण्याचा वापर सुधारेल. आमची या प्रकल्पासाठी निवड झाल्याचा कंपनीला सार्थ अभिमान आहे.
– अजित जैन, सहव्यवस्थापकीय संचालक,
जैन इरिगेशन सिस्टीम लिमीटेड