तळोदा। जैन पर्युषण पर्वनिमित्त नेमसुशिल विद्यामंदीर येथे नवकार मंत्र महात्म्य या विषयावर मध्यप्रदेश येथील प्राध्यापक पंकज चोपडा यांचे व्याख्यान आयोजीत करण्यात आले. जैन पर्युषण महापंर्वानिमित्त अहिसां व सत्य, नवकार महामंत्राचे महात्म्य या विषयावर व्याख्यान आयोजीत करण्यात आले होते.
यावेळी प्रा. चोपडा म्हणाले की, जैन असणे म्हणजे ज्यांर्नी जिन म्हणजे आत्म्यावर म्हणजे इंद्रियांवर विजय मिळविला आहे तो जैन म्हणावा. भगवान महविर हे मुळ क्षत्रिय होते त्यांनी अहिंसा व सत्याचा मार्ग अवलबून आपल्या इंद्रीयावर विजय मिळविला. त्याचप्रमाणे नवकार मंत्र फक्त जैन धर्माचा मंत्र नसून तो आपला आयुष्यात आचरणाचा व जिवनात लाभलेला श्रेष्ठ व्यक्ती व गुरुजन ,गुरूबंधू यांना मनापासून नमस्कार करण्याचा सर्व समावेशक मंत्र आहे. संत ज्ञानेश्वरांनी विश्वकल्याणासाठी ईश्वराकडे पसायदान मागीतले तसाच नवकार महामंत्र हा आपणास आदरणिय गुरूंना वंदनाचा मंत्र आहे. संस्थाअध्यक्ष निखिल तुरखिया,धनराज जैन, नरेश कोचर, गौतम जैन ,सोना तुरखिया ,दिलीप सेठीया, मुख्याध्यापिका बागूल मॅडम ,भावना डोगरे, परदेशी सर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.