जैन पेट्रोलपंपासमोर किरकोळ अपघात

0

जळगाव। शहरातील प्रभात चौकाजवळील जैन पेट्रोल पंपासमोर शुक्रवारी दुपारी 1.45 वाजता कारला मागून येणार्‍या कंटेनरने कट मारला. यात कारचे किरकोळ नुकसान झाले. कारचालकाने लागलीच जिल्हा पेठ पोलिस स्टेशन गाठत अपघातात बाबत माहिती दिली. त्यानुसार कंटेनरचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जयनगर येथील रहिवासी किशोर नथ्थु पाटील वय-55 हे कार (क्रं.एमएच.19.सीएफ.4843) ने प्रभात चौकाकडून आकाशवाणी चौकाकडे जात होते. या दरम्यान दुपारी 1.45 वाजेच्या सुमारास कंटनेर (क्रं.डब्ल्यू.23.9009) वरील चालक सुनिलकुमार बैजू यादव याने ट्रक भरधाव वेगात चालवून कारला मागून कट मारला. यात कारचे नुकसान झाले.
अपघात होताच पाटील यांनी लागलीच जिल्हा पेठ पोलिसांनी माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ट्रक ताब्यात घेतला. यानंतर किशोर पाटील यांच्या फिर्यादीवरून ट्रकचालक सुनिलकुमार यादव यांच्याविरूध्द जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूढील तपास मनोज शहा करीत आहेत.