नवी दिल्ली – गेल्या 20 दिवसांपासून प्रसिध्द जैन मुनी तरूणसागर यांना कावीळ झाल्याने नवी दिल्ली येथील मॅक्स रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृतीत सुधार न होता खालावली असून त्यांनी उपचार थांबवून चतुर्मासास्थळी जाण्याचा निर्णय घेलता आहे. सध्या सरूण सागर हे पुष्पदंत सागर महाराजांच्या परवानगीने संथारा घेत आहेत. संथारा म्हणजे जैन धर्मानुसार मृत्यू समीप पाहून अन्न-पाण्याचा त्याग करणे होय. दरम्यान तरूण सागर महाराज हे सध्या दिल्लीतील चातुर्मासस्थळी आहेत. गुरूवारी त्यांची प्रकृती ढासाळल्याने पुन्हा त्यांना रूग्णालयात हलविण्यात आले होते.