जैन यांचा अटकपूर्व जामीन मंजूर

0

जळगाव। जैन यांनी जामनेर येथील सुरेशदादा जैन पतसंस्थेतून सुमारे दीड कोटी रुपये कर्ज घेतले होते. मात्र ते कर्ज कोणतेही तारण न ठेवता घेतले होते. तसेच पतसंस्थेचे कार्यक्षेत्र जामनेर तालुक्यात पुरतेच मर्यादीत असताना जैन यांना कर्ज दिले होते. त्यामुळे विशेष लेखापरीक्षक यांनी सन 2016-17 या वर्षाच्या केलेल्या लेखा परीक्षणात ही बाब उघड झाली होती. त्यावरून35 जणांवर जामनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी सुरू असताना जैन यांनी व्याजासह कर्जाची दोन कोटी रुपयांची रक्कम एकाच वेळेस भरली होती. मात्र, अनियमित कर्जप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील संशयित युवराज राजाराम मोरे, सीमा युवराजसिंह परदेशी, सुभाषचंद्र लोढा, सुरेशदादा जैन यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केले होते. त्यावर सोमवारी सरकारपक्षातर्फे युक्तीवाद पुर्ण करण्यात आला. त्यानंतर न्या. दरेकर यांनी दोन्ही बाजू एकूण घेत संशयितांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.