जळगाव: जळगाव येथील जैन स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे आज कांताई सभागृहात शिक्षक दिनानिमित्त जळगाव जिल्ह्यातील विविध अशा खेळातील क्रीडा प्रशिक्षकांचा व क्रीड़ा शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जी.प .समाजकल्याण अधिकारी डॉ अनिता राठोड तसेच जैन चरिटीज चे दलीचंद जैन, बास्केटबॉलचे वरिष्ठ प्रशिक्षक प्रा व्ही.डी.पाटील, जैन स्पोर्टस् अकॅडमी चे क्रीडा समन्वयक फारुक शेख, प्राध्यापिका डॉक्टर अनिता कोल्हे यांच्या उपस्थितीत सर्व प्रशिक्षकांना व शिक्षकाना भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हाभरातील क्रीड़ा शिक्षक व प्रशिक्षक मध्ये चंद्रशेखर पाटील,प्रदीप साखरे, राजेश जाधव, जयांशु पोळ,निलेश पाटील, योगेश सोनवणे, प्रशांत कोल्हे, अलेक्झांडर मनी,दिगंबर महाजन, दीपक आरडे ,उल्हास ठाकरे, वर्षा सोनवणे, सौ कमलेश शर्मा, सौ.जयश्री माळी, सरिता खाचने, कृपाल ठाकूर, हरीश शेळके, अमोल चौधरी,विजय विसपुते, बादशाह सय्यद, आयेशा खान, प्रा. डॉ. अनिता कोल्हे,विवेक आळवणी, प्रवीण ठाकरे, अब्दुल मोहसीन, लियाकत अली सय्यद,अजित घारगे, वाल्मीक पाटील, नरेंद्र चव्हाण, समीर शेख ,वैशाली दीक्षित आदींचा समावेश होता.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक सादर करतांना फ़ारूक़ शेख यांनी एशियन गेम चे उदाहरण देऊन प्रशिक्षाकाचे महत्व विशद करुन हा पहिला कार्यक्रम असून भविष्यात मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा मानस व्यक्त केला.
डॉ अनिता राठौड़ यांनी त्या स्वतः शिक्षक व खेळाडू होत्या त्या नंतर त्या अधिकारी झाल्या म्हणून शिक्षक कसा महत्वाचा घटक आहे हे उदाहरण सह स्पष्ट केले
सौ कमलेश शर्मा व राजेश जाधव यांचे उत्कृष्ट असे मनोगत झाले तर अध्यक्षीय भाषणात दलीचंद जैन यांनी आपल्या ८६ वर्षाचे गुपित म्हणजे खेळ आहे हे विशद केले
सूत्रसंचालन सरिता खाचणे यांनी तर आभार प्रदर्शन विवेक आळवणी यांनी मानले