जैन हिल्समधील गाधी तीर्थ येथे महिला दिनानिमित्त सामुहिक प्रार्थना

0

जळगाव । जैन हिल्स येथील गांधी तिर्थ येथे बुधवारी महिला दिनानिमित्त सामुहिक प्रार्थना करण्यात आली. या दरम्यान, उपस्थित महिला कार्यकर्त्यांनी कार्यक्रमादरम्यान आप-आपले मत मांडले. तसेच त्यावर चर्चाही करण्यात आली. गांधी तीर्थ येथे कार्यरत सर्व महिलांनी आपल्या अभिव्यक्तिमध्ये ऐतिहासिक आणि वर्तमानात महिलांचे स्थान याबाबत विवेचन केले. सन्मान व समानता आधारित समाजाच्या निर्माणाकरिता, स्त्री आणिपुरुष दोघांची भूमिका महत्वपूर्ण आहे; असे ही उल्लेखित केले.

जर्मनीहून आलेल्या प्रो. गीता धरमपाल यांनी ‘महिला सबलीकरणातगांधीजींचे योगदान आणि स्वतंत्र संग्रामात महिलांची भूमिका’या विषयावर विचार मांडले. धरमपाल म्हणाल्या की गांधीजींच्या विचारांनी प्रभावित होऊन देशाकरता किती तरी महिलांनीयोगान दिले. स्वातंत्र्य पूर्व आणि नंतर भारताला एक देश आणि समाज म्हणून पुढे नेण्यात महिलांची भूमिका ही अतुलनीय राहिली. महिलांनी सर्वच क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. मग ते सांस्कृतिक क्षेत्र असो किंवा राजकारण, विज्ञान असो किंवा कला क्षेत्राशी निगडीत असो अशा सगळ्याच क्षेत्रात महिलांनी हिरहिरीने योगदान दिले आहे. प्रो गीता धरमपाल यांनी आपल्या वडिलांचे विचार व्यक्त करत सांगितले की, पाश्चिमात्य भागात महिलांना त्यांच्या वडिलांच्या किंवा पतीच्या माध्यमातून ओळखले जाते, मात्र भारताच्या संदर्भात सांगायचे झाल्यास महिलांची एक वेगळी ओळख आहे, असे सांगितले.