जैव इंधनाच्या प्रकल्पाने गावाचे अर्थकारण बदलेल

0

जळगाव । आज भारत पेट्रोलियम मंत्रालय भारत सरकार आणि नॅशनल युवा कॉपरेटिव सोसायटी संयुक्तविद्यमाने विश्व जैव ईंधन दिवसानिमित्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या जैव इंधन अभियानाचे व चर्चासत्राचे उद्घाटन कांताई सभागृहात करण्यात आले. याप्रसंगी नॅशनल युवा कॉपरेटिव सोसायटीचे राजेश पांडे, खासदार ए. टी. पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, आमदार स्मिता वाघ, संजय बिर्ला, अभय जैन, भरत अमळकर, भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष उदय वाघ, पारोळा नगराध्यक्ष करण पाटील, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन उर्मिला चौधरी यांनी तर आभार दिलीप पाटील यांनी मानले.

श्रृती कुलकर्णी प्रथम
विश्व जैंव ईंधन दिवसानिमित्त शाळांमध्ये चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या चित्रकला स्पर्धेंचा निकाल जाहीर करून विजेतांना पारितोषिक प्रदान करण्यात आले. यात गट 1ला श्रृती कुलकर्णी प्रथम, तेजल करोडीया द्वितीय तर सुजल सोनवणे तृतीय स्थानी आली. गट 2 मध्ये प्रथम किशोर सुरवाडे, द्वितीय अनन्या पुराणिक तर तृतीयस्थानी मानस वराडे आला. गट 3 रा निखिता पाटील प्रथम, निखिता जांगीड द्वितीय तर तृतीयस्थायी हर्षाली पाटील आली.

सामाजिक संस्थांनी प्रकल्प राबवावा..
जैविक इंधानाचे महत्त्व ओळखा असे आवाहन पाटील यांनी केले. दूध संकलनासाठी ज्याप्रमाणे गावागावत डेअरी आहे त्याच धर्तींवर गायीचे शेण, गामूत्र संकलन केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. जैव इंधनाचा प्रकल्प गावाचे अर्थकरण बदलणारा प्रकल्प ठरेल अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली. यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेवून प्रकल्प राबवावेत असे आवाहन पाटील यांनी केले. आगामी काळात प्रत्येक गोष्ट उपयोगात आणयची आहे. शहरातील कचराच्या प्रश्‍न आहे. यातून गावाची पत बदलणारा, गावाचा अर्थकारण बदल करणारा असा हा जैव इंधन उपक्रम आहे. याची निट माहिती घेतली पाहिजे, यासाठी गावागात कलेक्शन सेंटर सुरू केले पाहिजे. कचर्‍यापासून इथेनॉल, सळ्यापासून पेट्राले डीझेल तयार करण्याचे कारखाने उभारावे लागतील. असे प्रकल्प गावातच उभे राहिल्यास गावात रोजगार निर्माण होवून गावातील युवक रोजगारासाठी शहरात स्थलांतर करणार नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. जैव इंधानावर केवळ चर्चासत्र घेवून नका तर ही एक चळवळ बनली पाहिजे अशी अपेक्षा चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी के. बी. पाटील यांनी मार्गदर्शन केले.

शेतकर्‍यांनी अद्यावत शेती करावी
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विश्व जैंव ईंधन दिवसानिमित्त उपस्थितांना जैविक इंधानाची गरज आणि भविष्यातील जैविक इंधनाची उलब्धता याबात मार्गदर्शन केले. जैव इंधन कार्यक्रमासंबंधी जागृती आणण्यासाठी देशातील विविध राज्यातील 100 जिल्ह्यांमध्ये विश्‍व जैव इंधन दिवसानिमित्त कार्यक्रम घेण्यात आलेत. यात नागरिकांमध्ये जैविक इंधानबद्दल
जागृतता अभियान 11 ते 14 ऑगस्ट पर्यंत चालविलेले गेले. या अभियानाचा शेवट जळगाव जिल्ह्यांत करण्यात आला. याप्रसंगी पालकमंत्री चंद्रकात पाटील बोलत होते. पाटील यांनी जैव ईंधनाद्वारे आर्थिक विकास साधला जाणार असल्याचे सांगितले. तसेच यातून शेतकर्‍यांना लाभ मिळणार असून यातून देशला उर्जा संकटातून मुक्त होण्यास मदत मिळणार असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले. पारंपारिक शेती करून शेतकरी श्रीमंत होणार नाही यासाठी शेतकर्‍यांनी अद्यावत शेती करायला हवी अशी अपेक्षा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. गोमूत्र कँसरच्या रूग्णांसाठी उपयुक्त असून गायीचे शेण हे त्वचार रोगावर गुणकारी असल्याचे सांगितले. तसेच ते स्वतः गेल्या दहा वषार्ंपासून गायीच्या शेणापासून तयार केलेला साबण वापरत असल्याची माहिती दिली.