जैसरमेल । राजस्थानातील जैसरमैल येथे पाकिस्तानच्या सिमेलगत एक मोठी दुर्घटना घडली. सीमा सुरक्षा दलाच्या किशनगड फील्ड फायरिंग रेंजवर मंगळवारी फायरिंगचा नियमित सराव सुरू असताना मोर्टार अचानक फुटल्याने नऊ जवान जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. सीमा सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. किशनगड फिल्ड फायरिंग रेंजमध्ये बिकानेरच्या 112 तुकडीतील जवान 51 एम. एम मोर्टार फायरिंगचा सराव करत होते. त्यादरम्यान तािंत्रक बिघाडामुळे मोर्टारचा स्फोट झाला झाला. या स्फोटात सीमा सुरक्षा दलाचे नऊ जवान जखमी झाले.
त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सरावादरम्यान मोर्टार निशाण्यावर न जाता या जवानांपासून अवघ्या 10 ते 12 फुटांवर जाऊन फुटला. त्यामुळे जवानांना अॅम्युनेशनचे छरे आणि तुकडे लागले. जखमींना सुरुवातीला रामगड येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. त्याठिकाणी प्राथमिक उपचार झाल्यावर त्यांना जैसरमैलमधील हवाईदलाच्या रुग्णालयात दाखल केले गेले. या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश सीमा सुरक्षा दलाने दिले आहेत.