फ्लोरिडा। रेसलमेनिया 33 रिंगमध्ये जॉन सीना व निकी बेलाचा व मिज व मरीस सामना होता. हा सामना संपल्यानंतर स्टार जॉन व निकी बेलाला रिंगमध्ये लग्नाचे विचारून मैत्रीणसह प्रेक्षकांनाही आश्चार्याचा धक्का दिला.सामना संपल्यानंर जॉन सीनाने त्याच्या मैत्रीण निकीला विल यू मॅरी मी? अशी लग्नाची मागणी करून धक्का तर दिलाच मात्र त्याच रिंगमध्ये तिला अंगठी घालून त्यावर शिक्का मोर्ताब केला.
5 मिनिटात दोघांना धोबीपछाड देत सामना जिंकला
रेसलमेनिया 33 दरम्यान रविवारी जॉन सीना आणि निकी बेलाचा सामना मिज आणि मरीस यांच्यासोबत होता. परंतु जॉन आणि निकीच्या जोडीने केवळ 5 मिनिटात दोघांना धोबीपछाड देत सामना जिंकला. सामना संपल्यानंतर जॉन सीनाने रिंगमध्येच निकीला प्रपोज केले. या दरम्यान जॉन सीनाची आईदेखील तिथे उपस्थित होती. जॉन आणि निकी अनेक महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये होते. पण आता त्यांच्या नात्याला लग्नाचे नाव मिळणार आहे. मात्र लग्नाची तारीख अद्याप ठरलेली नाही.या सामन्यानंतर जॉन सीना आणि निकी बेला यांनी मोठ्या सुट्टीवर जाण्याची घोषणा केली. त्यामुळे काही दिवस तरी हे दोघे कोणत्याही सामन्यात दिसणार नाहीत.