जॉयक्लाईनचा हाफ मॅरेथॉनचा विश्‍वविक्रम

0

प्राग । केनियाची 23 वर्षीय जॉयक्लाईन जेपकोसगेईने प्राग हाफ मॅरेथॉन स्पर्धा विश्वविक्रम करित जिंकली. तिने 21.1 किमीची रेस 1 तास 4 मिनिटे 52 सेकंदात पूर्ण केली. ही तिच्या करिअरची पाचवी हाफ मॅरेथॉन आहे. जॉयक्लाईनने या मॅरेथॉनमध्ये 10, 15 आणि 20 किमी रेसचा विश्‍वविक्रमही मोडला. केनियन धावपटूने 10 किमीची रेस 30.05 मिनिटांत पूर्ण करून 2003 मध्ये ब्रिटिश धावपटू पॉला रेडक्लिफचा 30.21 मिनिटाचा विक्रम मोडला. 15 किमीची रेस 45.37 मिनिटांत पूर्ण करून तिने आपल्याच देशाच्या एका धावपटूचा विक्रम मोडला. केनियाच्या फ्लोरेंस किप्लागतने 2015 मध्ये 46.14 मिनिटात हे अंतर पूर्ण केले होते. जॉयक्लाईनने हाफ मॅरेथॉनमध्ये आपला वेग कायम ठेवला आणि नंतर 20 किमीचा सुद्धा नवा विक्रम केला.

20 किमीत तिने 1 तास, 1 मिनिट, 25 सेकंदांचा वेळ काढला. तिने 21.1 किमीचे हाफ मॅरेथॉनसुद्धा विश्वविक्रमासह (1.04.52 तासांत) पूर्ण केले. यावर्षीच केनियाच्या पेरेस जेपचिरचिरपेक्षा तिने 14 सेकंदांचा वेळ कमी घेतला.