जोकोविचची निशीकोरीवर मात करीत अंतिम फेरीत धडक

0

न्यूयॉर्क-अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने जपानच्या केई निशीकोरीचा पराभव करुन अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. जोकोविचने निशीकोरीवर ६-३, ६-४, ६-२ अशी मात करुन अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. जोकोविचने यंदाच्या विम्बल्डन ओपन स्पर्धेच्या विजेता ठरला आहे. त्यामुळे अमेरिकन ओपन जिंकून विक्रमी कामगिरी करण्याची चांगली संधी जोकोविचकडे आहे.

उद्या रविवारी होणाऱ्या अंतिम फेरीत जोकोविचचा सामना ज्युआन मार्टिन डेल पोत्रोशी होणार आहे.