जोकोविच, नदाल, मुगुरुजा, कॅरोलिनची विजयी सलामी

0

पॅरिस । फ्रेंच ओपनच्या पहिल्या फेरीत काळ धक्कादायक निकालानंतर नोव्हाक जोकोविच, राफेल नदाल यांनी पुरुष एकेरीत तर गर्बाइन मुगुरुजा, कॅरोलिन वोजानियाकी यांनी महिला एकेरीत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. जागतिक क्रमवारीत दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या सर्वियाच्या जोकोविचने स्पेनच्या मार्सेल ग्रेनोलर्सचा 6-3, 6-4, 6-2 असा पराभव केला.

दुसरीकडे विक्रमी दहाव्या फ्रेंच ओपन विजेतेपदासाठी खेळत असलेल्या राफेल नदालने फ्रान्सच्या बेनोईट पियरीचा 6-1, 6-4,6-1 असा सहज पराभव करून दुसर्‍या फेरीत प्रवेश केला. महिला एकेरीत स्पेनच्या गर्बाइन मुगुरुजाने इटलीच्या फ्रान्सिस्का शियावोनला सरळ दोन सेटमध्ये 6-2, 6-4 असे नमविले. डेन्मार्कची 11वी मानांकित कॅरोलिन वोजनियाकीने ऑस्ट्रेलियाच्या जेमी फोरलिसचा 6-4, 3-6, 6-2 असा पराभव करत पुढची फेरी गाठली.