हडपसर । कोणताही व्यवसाय सुरू करताना जोखीम स्वीकारावी लागते. जोखीम स्वीकाराल्या नंतर यश निश्चित मिळते. जेवढी मोठी जोखीम तेवढा मोठा नफा मिळत असतो. मराठी माणूस जोखीम स्वीकारायला घाबरतो. व्यवसायात जोखीम अपरिहार्य असते. दुर्दम्य इच्छाशक्ती, प्रामाणिकपणा, परिश्रम, चिकाटी, व्यावहारिकता या तत्वांच्या आधारे व्यवसायात उत्तुंग भरारी घेता येते. असे उद्योजक रामदास माने यांनी सांगितले.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब मगर महाविद्यालयात माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयातील व्यवसाय अभ्यासक्रम विभागाच्या वतीने ‘मी कसा घडलो’ या विषयावर रामदास माने यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रामदास माने बोलत होते. अध्यक्षस्थानी आचार्य अत्रे प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते होते. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शर्मिला चौधरी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. अध्यक्षस्थानी आचार्य अत्रे प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते यांनी युवकांनी व्यवसायाकडे साकारात्मक्तेने पाहून नोकरी पेक्षा व्यवसायाला महत्व द्यावे असे सांगितले. प्राचार्या डॉ. शर्मिला चौधरी उपप्राचार्य डॉ. भाऊसाहेब बेंद्रे, प्रा. अनिल जगताप, प्रा. एस. एम. महाजन, डॉ. मेघना भोसले, डॉ. प्रशांत मुळे, डॉ. शुभांगी औटी, डॉ. नाना झगडे, प्रा. नितीन लगड, प्रा. संजय कामठे, एम. एन. कदम आदी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या शिबिराचे संयोजन प्रा. अनिल जगताप यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. नितीन लगड यांनी केले. आभार प्रा. संजय कामठे यांनी मानले.