जोगल खोरीतील अल्पवयीन तरुणीस पळवले

0

भुसावळ- तालुक्यातील जोगलखोरी येथील 15 वर्षीय अल्पवयीन तरुणीला फूस लावून पळवून नेण्यात आल्याची घटना 9 सप्टेंबर रोजी रात्री घडली. याप्रकरणी अनोळखी व्यक्ती विरूध्द येथील तालुका पोलिस ठाण्यात तरुणीच्या पित्याने दिलेल्या फिर्यादीवरून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक गजानन करेवाड तपास करीत आहे.