चाळीसगाव – जोगेश्वरी येथे सीएम चषक सुरु असताना त्याठिकाणी महिला कुस्ती स्पर्धेत साई क्रीडा संकुल कांदिवली येथे 30 डिसेंबर रोजी सायंकाळी 44 किलो गटात चाळीसगाव येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील रहीवासी तथा ए.बी. हायस्कूलची इयत्ता नववीची विद्यार्थीनी पैलवान नेहा जाधव हिने प्रथम क्रमाक मिळवला व वैष्णवी शर्मा हिने दुसरा क्रमाक मिळवला स्थानिक आमदार डॉ.भारती लवेकर यांच्याहस्ते नेहा जाधव हिला बक्षीस देण्यात आले. तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. गौतम जाधव यांची ती पुतणी आहे.