जोडीदार निवडीपुर्वी असावा सुंसवाद

0

शहादा । शहरातील कुलकर्णी हॉस्पीटल येथे अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर्फ जोडीदार निवडीपुर्वी सुंसवाद असावा यासाठी पालक व मुलामुली साठी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी अंनिसच्या राज्य कार्यवाहक पनवेल येथील राज्य कार्यवाहक आरती नाईक उपस्थित होत्या.यावेळी त्या म्हणाल्या की विवाह सुसंवाद हीच जोडीदार निवडीपुर्वीची अट असावी.लग्न जुळताना पारंपरिक पध्दतीला फाटा देणे,खर्चावर नियंत्रण, रक्त चाचणी व विवाहपूर्व सुसांवाद असणे आवश्यक आहे. आरोग्याबाबतचे दोघांचे अज्ञान जसे मासिकपाळी, वीर्य चाचणी यावर मोकळा संवाद केला .

गटागटाच्या माध्यमातून चर्चा
आरती नाईक, महेंद्र नाईक,सतीष उगले यानी चित्रफितीत वेगवेगवेगळ्या खेळ्याच्या माध्यमातून त्याचप्रमाणे गटागटाच्या माध्यमातून चर्चा करुन जोडीदार कसा निवडावा यावर प्रकाश टाकला. आरती नाईक यानी आपल्या मनोगतात एका स्त्रीने तिच्या पतिच्या लैंगिक असक्षमतेमुळे ती 11 वर्षापासून कशी वंचीत राहिली हे सांगताना पूर्ण सभागृह सुन्न होवून गेले होते. कार्यक्रमात अभिजित पाटील, हैदर अली नुरांनी, संभु पाटील, डॉ.बी.डी.पटेल,विनायक पवार,संगिता पाटील, रवींद्र पाटील, संतोष महाजन, मणियार उपस्थित होते. कार्यक्रम 9 ते 5 यावेळेत संपन्न झाला. कार्यक्रमात सहभाग नोंदविण्यासाठी शहादा ,अमळनेर, धुळे, नंदुरबार ,तळोदा ,वापी ,शिंदखेडा येथून पालक व मुल मुली आले होते.