जोधपूर – राजस्थानच्या जोधपूरमध्ये वायुसेनेचे मिग- २७ लढाऊ विमान कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. एका रुटीन मिशनदरम्यान हे विमान कोसळले आहे. सिरोही जिल्ह्यातल्या शिवगंज येथे ही घटना घडली आहे. घटनास्थळावर वायुसेनेच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली आहे. जीवित हानीबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही. हा अपघात नेमका कसा झाला याची चौकशी सुरु आहे. याआधीही राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यात वायुसेनेचे मिग-२१ लढाऊ विमान कोसळल्याची दुर्घटना घडली होती, त्यावेळी पायलटने पॅराशूटच्या सहाय्याने आपला जीव वाचवला होता.