जोनाथन लुक्का पुणे सिटीशी करारबद्ध

0

पुणे । राजेश वाधवान समूह आणि ह्रतिक रोशन यांच्या सहमालकीच्या इंडियन सुपर लीगमधील फ्रॅचायझी एफसी पुणे सिटी संघाने आगामी मौसमासाठी ब्राझिलियन मध्यरक्षक जोनाथन लुक्का याला पुन्हा करारबद्ध केले आहे. एफसी पुणे सिटी संघाकडून 23 वर्षीय जोनातन लुक्का 2016च्या मालिकेत 14 सामने खेळला आहे.

एफसी पुणे सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव मोडवेल म्हणाले, लुक्का हा उत्कृष्ट खेळाडू असून चाहत्यांचा देखील तो आवडतीचा खेळाडू आहे. गेल्या मौसमात तो प्रत्येक सामना शेवटच्या 90 मिनिटांपर्यंत खेळला आहे. युवा आणि प्रतिभाशाली जोनाथनला एफसी पुणे सिटी संघातून खेळताना नेहमीच अगदी घरच्यासारखा वाटते. कारण त्याला सर्व चाहत्यांचाही पाठिंबा मिळतो. संघाचे पुरस्कर्ते यांचाही तो अतिशय आवडता आहे. ब्राझिलियन युवा खेळाडू जोनाथन लुक्काने आपल्या कारकिर्दीची सुरुवात ब्राझिलियन आंतरराष्ट्रीय क्लबमधून केली. त्यानंतर त्याचा समावेश एएस रोमा संघात झाला. त्यानंतर गिल्लारोस्सी संघाकडून तीन वर्षे खेळताना त्याने 32 सामन्यांमध्ये 9 गोल केले.

जोनातन लुक्का म्हणाला, एफसी पुणे सिटी संघाकडून खेळताना माझ्या कारकिर्दीतील सर्वोत्तम अनुभव मिळत आलेला आहे. एफसी पुणे सिटी संघाने यावर्षीच्या मौसमात काही अतिशय दर्जेदार खेळाडू करारबद्ध केले.