भुसावळ- कल्याणसह पनवेल, लोणावळा भागात सुरू असलेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे अप-डाऊन हुतात्मा एक्स्प्रेसच्या मार्गात बदल करण्याचा रेल्वे प्रशासनाने निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक अप 11025 भुसावळ-पुणे (हुतात्मा एक्सप्रेस) 11 रोजी कल्याण-पनवेल मार्गाऐवजी मनमाड-दौंड मार्गाने रवाना होणार आहे तर डाऊन 11026 डाऊन पुणे-भुसावळ (हुतात्मा एक्सप्रेस) 11 रोजी दौंड-मनमाड मार्गाने भुसावळ येईल.