मुंबई:मुंबईसह उपनगरात कालपासून जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जनजीवन विस्कळीत होण्याची भीती आहे. अनेक सखल भागात पाणी साचले आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई, पालघर या भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान पावसाचा जोर कायम राहण्याचे चिन्ह दिसत असल्याने मुंबई आणि उपनगरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी याबाबत माहिती दिली आहे. तसेच राज्यभरात पाऊस सुरु असल्याने राज्यातील शाळांना सुट्टी देण्याची आवश्यकता असेल तर स्थानिक जिल्हाधिकारी यांनी सुट्टी जाहीर करावी याबाबत निर्देश शिक्षण मंत्र्यांनी दिले आहे.