पुणे : कोथरूडमधून महायुतीचे उमेदवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अर्ज दाखल केला. जोरदार शक्तीप्रदर्शन करत चंद्रकांत पाटील उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार गिरीश बापट, संजय काकडे, विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे उपस्थित होते. विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांचा तिकीट कट करण्यात आल्याने हा मतदारसंघ राज्यत चर्चेत होते.
मी पुण्याचा जावई आहे. पुण्याचे अनेक प्रश्न मी सोडविले. गेल्या तीन-चार महिन्यापासून पुण्याचा पालकमंत्री आहे म्हणून त्यांनी पुण्यातील कोथरूडमधून उमेदवारीसाठी दावा केला. मात्र त्यांना येथे शिवसेनेचा विरोध होता. चंद्रकांत मोकाटे यांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केला. यावेळी त्यांनी मोकाटे यांची समजूत घालताना, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे माझे मित्र आहेत. तुम्ही मला सहकार्य करा, असे पाटील यांनी सांगितले. त्यानंतर मोकाटे पाटील यांनीही रॅलीत सहभागी झाले होते.