जो खासदार राम मंदिराला विरोध करेल त्याचं देशात फिरणं कठीण – संजय राऊत

0

नवी दिल्ली : राम मंदिर बांधण्यासाठी अध्यादेश काढण्यात यावा अशी मागणी होते आहे. शिवसेनेनेही हा मुद्दा उचलून धरला असून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे २४ आणि २५ नोव्हेंबरला अयोध्या दौरा करणार आहेत. त्यामुळे शिवसैनिकही त्या दिशेने रवाना झाले आहेत. अशात जो खासदार राम मंदिराला विरोध करेल त्याचं देशात फिरणं कठीण होईल असा इशाराच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. राष्ट्रपती भवनापासून उत्तरप्रदेशातपर्यंत भाजपाचेच सरकार आहे. तरीही अध्यादेश येण्यास एवढा वेळ का लागतो आहे असा प्रश्नही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

आम्ही त्यावेळी १७ मिनिटात बाबरी मशीद पाडली होती आता या मंदिरासंबंधी अध्यादेश आणण्यासाठी इतका वेळ का लागतो आहे? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे. राज्यसभेत असे अनेक खासदार आहेत ज्यांना राम मंदिर हवे आहे आणि त्यासाठीचा अध्यादेशही हवा आहे. जो खासदार विरोध दर्शवेल त्याचं देशात फिरणं कठीण होईल असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.