‘जो रामाचा नाही, तो कामाचा नाही’; नाराज शिवसैनिकाचा राजीनामा !

0

मुंबई : महाराष्ट्रात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार स्थापन करणार आहे. उद्या मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे शपथ घेणार आहे. महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असणार आहे. मात्र शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून कॉंग्रेस सोबत जाण्याचा निर्णय अनेकांना पचनी पडलेला नाही. त्यातच युवसेनेचे पदाधिकारी रमेश सोळंकी यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आहे. ‘जो रामाचा नाही, तो कामाचा नाही’ असे ट्वीट करून रमेश सोळंकी यांनी राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. कॉंग्रेसने राम मंदिर उभारणीला विरोध केले आहे, त्याच कॉंग्रेस सोबत जाऊन शिवसेना सरकार स्थापन करणार असल्याने सोळंकी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सोळंकी याने ट्विटमध्ये लिहिले आहे की, मी शिवसेनेच्या युवा सेनेच्या पदाचा राजीनामा देत आहे. माझा अंतरात्मा आणि वाचारधारा काँग्रेससोबत काम करण्याची परवानगी देत नाही. गेल्या काही दिवसांपासून माझे मत जाणून घ्यायचे होते. आता मला माझी भूमिका मांडायची आहे. जो माझ्या श्रीरामाचा नाही (काँग्रेस), तो माझ्या काही कामाचा नाही आहे. पुन्हा एकदा आदित्या ठाकरे यांचे धन्यवाद. तुमच्यासोबत काम करण्यात आनंद मिळाला असे म्हटले आहे.