कॅलिफोर्निया : खगोल शास्त्रज्ञांना आता पर्यंत माहित असेल्या लघुग्रहांच्या समुच्चयांच्या तुलनेत जुना लघुग्रह समुच्चय आढळून आला आहे. मुख्य लघुग्रह पट्ट्याच्या अंतर्गत भागात हा समुच्चय दिसत आहे.
मुख्य पट्ट्यात अनेक अनियमित आकाराचे लघुग्रह सूर्य, मंगळ आणि गुरूभोवती फिरत असतात. अमेरिकेतील साऊथवेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटमधील अंतराळ तज्ज्ञांनी सामर्थ्यशाली दुर्बिणीचा वापर करून हे लघुग्रह समांतर कक्षांमध्ये फिरत असल्याचे पाहिले आहे. मोठ्या आकाराच्या लघुग्रहांच्या टक्करीतून हे छोटे लघुग्रह तयार झाले त्याला कोट्यवधी वर्षे लोटली आहेत. नव्या लघुग्रह समुच्चयाच्या शोधामुळे मुख्य पट्ट्यातील लघुग्रहांच्या इतिहासाचे ज्ञान होणार आहे. लघुग्रह सुर्याभोवती फिरतात तेव्हा त्यांचा पृष्ठभाग प्रचंड तापतो. रात्री थंड होताना ते किरण उत्सर्जित करतात. या प्रक्रीयेत त्यांच्यात बदल होतो. यास्तव अजुन काही कोटी वर्षांनी लघुग्रहांचा नवा शोधलेला समुदाय ओखळखूही येणार नाही. सायन्स नावाच्या जर्नलमध्ये ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.