ज्ञानदीप विद्यालयामध्ये मोफत पुस्तकांचे वाटप

0

पांडुरंग भालेकर यांनी राबविला उपक्रम

पिंपरी-चिंचवडः रूपीनगर येथील ज्ञानदीप विद्यालयातील आठवीच्या विद्यार्थ्यांना भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनानुसार महापाहिलकेचे स्वीकृत सदस्य प्रवीण भालेकर यांच्यावतीने मोफत पुस्तक संचाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था कार्याध्यक्ष शांताराम भालेकर होते. यावेळी आमदार लांडगे यांचे बंधु कार्तिक लांडगे, डी. एम. भालेकर, दिगंबर भालेकर, सुधाकर दळवी, संपत भालेकर, रमेश भालेकर, कुंडलीक वर्‍हाडी, प्राचार्य सुर्यकांत भसे, सिद्धेश्‍वर जाधव आदी उपस्थित होते.

माझे वचन पूर्ण केले
यावेळी पांडुरंग भालेकर म्हणाले की, शासनातर्फे अनुदानित तुकड्यातील विद्यार्थ्यांनाच मोफत पुस्तके दिली जातात. विना अनुदानित मान्यताप्राप्त तुकड्यांमधील विद्यार्थ्यांना पुस्तके दिली जात नाहीत. ही मुले पुस्तकाविनाच वंचित राहू नयेत, यासाठी प्रा. भसे यांना गरिब व कष्ठकरी मुलांना पुस्तके संच देण्याचे मान्य केले होते. ते वचन मी आज पुर्ण केले. चांगल्या प्रकारे अभ्यास करून जीवनात यशस्वी व्हावे. कार्तिक लांडगे म्हणाले की, ही संस्था, ही शाळा गरिब व कामगारांच्या मुलांसाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असतात. काही शाळा मुलांचे आणि पालकांची पिळवणूक करीत आहेत. तर ही शाळा मुलांच्या हितासाठी झटते आहे. भोसरी विधानसभा मतदार संघ सर्व सुविधांनीयुक्त महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर यावा यासाठी आमदार महेश लांडगे यांनी संकल्प सोडला आहे. त्यासाठी 27 एकरमध्ये नवीन शासकीय अभियांत्रिकी कॉलेज व मेडिकल कॉलेज सुरू करण्यात येणार आहे. येथील गरिब व कामगारांच्या मुलांचे अभियंता बनण्याचे स्वप्न साकार होणार आहे.

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाला शरद भालेकर, संतोष नखाते, किरण खुडे, ज्योतीराम गव्हाणे, गंगाराम भालेकर, सागर भालेकर, रविराज भालेकर, स्वप्नील वाघमारे, अजय चौधरी, रामदास कुटे, विशाल भालेकर, सोमेश्‍वर नेमाणे, ह.भ.प. काळुराम भालेकर व शिक्षक हे सर्व उपस्थित होते. सूत्रसंचालन सुबोध गलांडे यांनी केले तर दयानंद सोनकांबळे यांनी आभार मानले.