ज्ञानपूर्णा विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा व वृक्षारोपण

0

मुक्ताईनगर। तालुक्यातील इच्छापूर निमखेडी बु. येथील ज्ञानपूर्णा विद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा व वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एन.आय. पाटील होते. प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य गणेश बोंडे, रतीराम पाटील, कोकीळा धात्रक व मंजुळा पाटील या उपस्थित होत्या. प्रसंगी गणेश बोंडे यांनी शाळेला 200 झाडे दिल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात येऊन वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांचे जीवनावर आधारित विषयावर विद्यार्थ्याची वक्तृत्व स्पर्धा झाली. 5 वी ते 7 वी गटातून पूजा धाडे ही प्रथम, तर वैशाली बेलदार आणि शीतल चिखलकर यांना विभागातून द्वितीय तर प्रतीक्षा वाघ आणि सुजाता इंगळे यांचा विभागून तृतीय क्रमांक आला. सूत्रसंचालन विनायक वाडेकर व बी.आर. मुळक यांनी केले तर आभार पर्यवेक्षक सी.बी. मोरेसकर यांनी मानले.