ज्ञानपूर्णा विद्यालयात शिक्षक दिनानिमित्त वकृत्व स्पर्धा

मुक्ताईनगर प्रतिनिधी….

तालुक्यातील इच्छापूर् बुद्रुक येथील ज्ञानपूर्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे 5 सप्टेंबर या शिक्षक दिनानिमित्त वकृत्व स्पर्धा संपन्न झाली तीन गटात झालेल्या या स्पर्धेनिमित्त विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.

विविध गटा नुसार निकाल खालील प्रमाणे देण्यात आला.

ज्योत्स्ना रामेश्वर वानखेडे ( बाल गट प्रथम),माध्यमिक गटातून इयत्ता 8 वी मधून प्रथम हर्षल मोहन गाजरे,द्वितीय मुक्ता नंदलाल घटे,इयत्ता 9वी शिवम धनराज कांडेलकर (प्रथम),ज्योत्स्ना रवींद्र तायडे (द्वितीय), इयत्ता 10 वी रिंकू जितेंद्र झोपे (प्रथम),रुचिता विजय साळुंखे (द्वितीय) आणि ज्युनियर कॉलेज गटातून स्नेहल रमेश तायडे (प्रथम), जय अरुण कोंगडे (द्वितीय) तर माध्यमिक गटातून उत्स्फूर्त पारितोषिक म्हणून प्रतीक्षा रामेश्वर वानखेडे ला पारितोषिक देण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश भटक्या जाती विमुक्त जमाती काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अनिल वाडीले हे होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य बी डी बारी ,सेवानिवृत्त पर्यवेक्षक सुभाष भोई, माजी मुख्याध्यापक बी एस वानखेडे,प्रा सुभाष पाटील उपस्थित होते. परीक्षक म्हणून भगवान केशव महाजन, प्रा.मनोज भोई, मीनल कोल्हे यांनी काम पाहिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र तायडे यांनी तर आभार विनायक वाडेकर यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी आशा कांडेलकर सुधीर मेढे, प्रदीप पाटील , बाळासाहेब देशमुख, गोपाळ सपकाळ,बेबाबाई धाडे,विनोद पाटील यांनी प्रयत्न केले