मुक्ताईनगर- तालुक्यातील इच्छापुर निमखेडी बु.॥ येथील ज्ञानपूर्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये मतदार साक्षरता क्लबची स्थापना करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालयात मतदारांमध्ये जागृती व्हावी तसेच मोठ्या प्रमाणावर मतदारांची नोंदणी व्हावी तसेच ज्यांची वयाची अठरा वर्ष पूर्ण झाली असतील त्यांची नावे मतदारयादीत समाविष्ट करण्यात यावी या उद्देशाने निवडणूक आयोगाने अशा क्लबची स्थापना करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार ज्ञानपूर्णा विद्यालयात प्राचार्य एन.आय.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या क्लबची स्थापना करण्यात आली. त्यासाठी इयत्ता अकरावी कला व बारावी कला अशा दोन क्लबची स्थापना करण्यात आली आहे. नोडल अधिकारी म्हणून विनायक वाडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा परीषद शाळेचे शिक्षक व बीएलओ किशोर मोहन बुधवंत हे या प्रसंगी उपस्थित होते. इयत्ता अकरावी कला या वर्गातील क्लबमध्ये विशाल संतोष पाटील, त्रेस्कॉथिक गणेश राठोड, इंगळे मनोज युवराज, सर्वेश सोपान भडांगे, निखील किशोर चोपडे, जयश्री जनार्दन भगत, सपना सुपडू बोरसे, यांची निवड करण्यात आली. बारावी कला या वर्गाच्या क्लबमध्ये मयूर रतीराम बेलदार, रामेश्वर सरदार चव्हाण, मिलिंद प्रभाकर इंगळे, सोपान महादेव कांडेलकर, किरण किशोर खंडारे, शीतल भगवान भोंगरे, ज्ञानेश्वरी श्रीकृष्ण गणगे व मुक्ता नामदेव मोरे या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.