पुणे । ज्ञानप्रबोधिनी प्रशालेत स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. संस्थेचे संचालक डॉ. गिरीश बापट यांच्या हस्ते सकाळी 7.30 वाजता ध्वजारोहण झाले. त्यानंतर छोटा गट (इ. 5 वी ते 8 वी) व मोठा गट (इ. 9 वी व 10 वी) यांनी विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर केले.
स्वातंत्र्यदिनानिमित्त मोठ्या गटासाठी प्रा. प्रांजल अक्कलकोटकर यांचे ‘स्वतंत्रदेशाचा राष्ट्रधर्म’ या विषयावर व्याख्यान झाले. तर छोट्या गटात 12 कौशल्यांवर आधारित गुणविकास उपक्रमाचा बक्षीस समारंभ पार पडला. साळुंब्रे येथील ग्रामप्रबोधिनीचे प्राचार्य व्यंकटराव भताने यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी त्यांनी मुलांना ‘अभ्यासेत्तर कौशल्यांचे महत्त्व’ यावर मार्गदर्शन केले. यावेळी शाळेचे आजी-माजी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.