ज्ञानाचा मार्ग विकासापर्यंत गेला पाहिजे : डॉ.प्रा.राम ताकवले

0

शेलपिंपळगाव : ज्ञानाचा मार्ग केवळ ज्ञानार्जनापुरता न राहता तो विकासापर्यंत गेला पाहिजे. आगामी काळात कृतीशील मूल्याधिष्ठित शिक्षण स्विकारुन जीवन शिक्षणाकडे जावे लागणार आहे. असे मत ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ माजी कुलगुरु डॉ.प्रा.राम ताकवले यांनी व्यक्त केले. जीवनप्रबोधिनी ट्रस्ट, महाराष्ट्र ज्ञान मंडळ आणि माऊली शिक्षण संस्थेच्या विविध विद्या शाखांच्या वतिने आळंदी येथे आयोजित केलेल्या भविष्यवेधी शिक्षण व भविष्यातील शिक्षक या विषयावर डॉ.ताकवले यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले.

खेड तालुका डिजिटल स्कुल अंतर्गत आळंदी पंचक्रोशीतील 11 माध्यमिक विद्यालये व 2 महाविद्यायांसाठी आळंदी पंचक्रोशी सिलेज हा उपक्रम सुरु केला आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जीवन विद्या ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष व धनंजय गाडगीळ यांनी केले. शाश्‍वत ग्राम विकास केंद्राचे समन्वयक डॉ.प्रा. कैलास बवले यांनी खेड तालुका डिजिटल स्कुल प्रकल्प समजावून सांगितला.व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिलेज प्रकल्पात खेड तालुक्याची निवड झाल्याने हा प्रकल्प वेगाने पुढे जाईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. यावेळी माऊली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, सहसचिव मुख्याध्यापक यादव सर,व तालुक्यातील शिक्षक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत मुंगसे सर यांनी केले.