भडगाव । जगातील सर्वच प्रगत राष्ट्रांच वय हे 50च्या पुढे असून, भारताच मात्र 25 वर्षाचे आहे. यामुळे संपूर्ण जग भारताकडे तरुणांचा देश म्हणून बघतो आहे. तसेच भारताकडे जग हो मोठा ग्राहक वर्ग म्हणून देखील लक्ष ठेऊन आहे. परंतु देशातील तरुणांच्या कल्पक व संशोधक दृष्टीचा विचार केल्यास, त्यांनी लावलेल्या ज्ञानाधारीत शोधामुळे हा उगवता भारत जगावर राज्य करेल असं भविष्यातील चित्र आहे. पण त्यासाठी अर्थसंकल्पावर चर्चा होण्याबरोबर ज्ञानसंकल्पावर चर्चा व्हावी, तरुणांनी अर्थाजनाचे पुजारी होण्यापेक्षा ज्ञानाच्या भांडाराचे पुजारी व्हावे अशी अपेक्षा झी 24 तास वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर (मुंबई) यांनी उगवता भारत या विषयावर केशवसुत व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुफतांना व्यक्त केले. व्यासपीठावर माजी आमदार दिलीप वाघ, प्रायोजक विनय जकातदार, माजी उपसभापती संभाजी पाटील, विनोद पाटील, विकास भदाणे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
भारतीय तरूणांना अनेक संधी उपलब्ध
भविष्यात जल, विद्युत हे शासनाच्यावतीने नागरिकांना पुरविण्यात येणार नाही तर जल हे पुर्नवापर करुन तर सोलर पॅनल द्वारे विद्युत सेवा नागरिकांना स्वःताला उपलब्ध करावी लागेल प्रचंड वाढत्या लोकसंख्येस शासन ह्या सुविधा पुरवु शकत नाही. कचरा निर्मूलनाचा प्रश्न आगामी काळात भारतास प्रचंड प्रमाणात भेड सावणार आहे. तरुणांपुढे अनेक संधी उपलब्ध आहेत, त्यांनी उाव्हाणांना सामोरे जाऊन नाही रे गटाचे सभासद होण्यापेक्षा होय रे गटाचे सभासद व्हावे व या उगवत्या भारताचे नेतृत्व करावे असे आव्हान केले. व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प कै.मधुकर व आक्काताई जकातदार यांच्या स्मृतिपित्यर्थ विनय जकातदार व सुनंदा जकातदार यांनी प्रायोजित केले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. दिनेश तांदळे यांनी तर आभार सुरेश भंडारी यांनी व्यक्त केले.