भुसावळ शहरासह विभागात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

भुसावळ शहरासह विभागात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन : सोशल डिस्टन्सचे काटेकोर पालन : शाळा-महाविद्यालयातही प्रतिमा पूजन

भुसावळ : भुसावळ शहरासह विभागात भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना 130 व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. कोरोना निर्बंधामुळे सोशल डिस्टन्सचे पालन करून पदाधिकार्‍यांनी महामानवाच्या पुतळ्यासह प्रतिमेस ठिकठिकाणी अभिवादन केले. भुसावळ शहरातील जुन्या पालिकेबाहेरील महामानवाच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी दिवसभर गर्दी झाली होती. शाळांमध्ये निवडक शिक्षकांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन करण्यात आले.

भुसावळात महामानवास भाजपा पदाधिकार्‍यांनी केले अभिवादन
भुसावळ :
भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व, युगपुरुष महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त भुसावळ भाजपा पदाधिकार्‍यांनी जुन्या पालिका कार्यालयासमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी आमदार संजय सावकारे, भाजपा शहराध्यक्ष परीक्षीत बर्‍हाटे, माजी नगराध्यक्ष युवरात लोणार, नगरसेवक राजेंद्र नाटकर, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, सरचिटणीस रमाशंकरजी रामप्यारे दुबे, सरचिटणीस संदीन सुरवाडे, उपाध्यक्ष बिसनजी दा गोहर, उपाध्यक्ष मंगेश पाटील, उपाध्यक्ष अनिरुध्द कुलकर्णी, भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष शंकरजी शेळके, अलका शेळके, विशेष आमंत्रित सदस्य राहुल तायडे, दिनेश दोधाणी, संजय बोचर, नंदकिशोर बडगुजर, प्रशांत भट, अथर्व पांडे, सागर महाजन आदींची उपस्थिती होती.

भुसावळात विश्‍वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीतर्फे महामानवास विनम्र अभिवादन
भुसावळ :
विश्‍वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीतर्फे महामानवास जयंतीनिमित्तन बुधवारी अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी जुन्या पालिकेसमोरील महामानवाच्या पूर्णाकृती पुतळ्यास जयंती समिती अध्यक्ष सुदाम सोनवणे, आरपीआय उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे, माजी उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांचे सुपूत्र रोहन सूर्यवंशी, नगरसेवक रवी सपकाळे, वंचित बहुजन आघाडीचे बाळा (विजय) पवार, माजी जयंती उत्सव अध्यक्ष बाळा मोरे, आरपीआय युवा कार्याध्यक्ष गिरीष तायडे, भीम आर्मीचे भुरा सपकाळे, माजी जयंती उत्सव समिती अध्यक्ष बाळा सोनवणे, योगेश तायडे, आरपीआयचे खान्देश प्रांत अध्यक्ष लक्ष्मण जाधव, आरआयपीचे पप्पू सुरडकर, विश्‍वास खरात, सुनील ढिवरे, बबन कांबळे, श्रीकांत वानखेडे, मनोज बिरारी, शुभम सोयंके, सुनील रायमळे, राजू तायडे यांच्यासह काँग्रेस शहराध्यक्ष रवींद्र निकम पदाधिकारी व कार्यकत्यांनी विनम्र अभिवादन केले.

रावेरात महामानवास अभिवादन
रावेर-
रावेर शहरासह परीसरात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडेकर यांची जयंती कोरोना नियमांचे पालन व सोशल डिस्टनचे पालन करून साजरी करण्यात आली तर काही ठिकाणी महसूल अधिकार्‍यांनकडून सोशल डिस्टनचा फज्जा उडालेला बघायला मिळाला. कोरोनाच्या महामारीत बुधवारीत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कोरोना नियमांचे पालन करून साजरी करण्यात आली. रावेर शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेस आमदार शिरीष चौधरी यांनी हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तहसीलदार उषाराणी देवगुणे देखील उपस्थित होत्या. जबाबदार झटकांनी मास्क लावला असलेतरी सोशल डिस्टन्सचा अभाव जाणवला.

नियम पाळुन साजरी झाली जयंती
रावेर तहसील कार्यालय, नगरपालिकेतदेखील कोरोनाचे नियम पाळुन डॉ1.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. या सोबत ग्रामीण रुग्णालय, रावेर पंचायत समिती, झेडपी बांधकाम विभाग, पोलिस स्टेशन बाजार समिती आदी ठिकाणी कोरोना नियमाचे पालन करून जयंती साजरी करण्यात आली.

एन.के.नारखेडे नारखेडे स्कूल
भुसराव :
एन.के.नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ुसावळ या शाळेत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती साजरी करण्यात आली. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ भुसावळ या संस्थेचे चेअरमन पी.व्ही. पाटील यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. संस्थेचे ऑननरी जॉईन सेक्रेटरी तथा नगरसेवक प्रमोद नेमाडे व शाळेच्या मुख्याध्यापिका कोमल कुलकर्णी यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण केले.

दा.दे.ना.भोळे महाविद्यालय
भुसावळ-
शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात महामानवाची 130 वी जयं साजरी करण्यात आली. यावेळी डॉ आंबेडकर यांच्या प्रतिमेस प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी प्रा.डॉ.जी.पी.वाघूलदे, प्रा.डॉ.एस.व्ही.बाविस्कर, प्रा.डॉ.जगदीश चव्हाण, भालेराव उपस्थित असल्याचे प्रसिद्धी प्रमुख प्रा.डॉ.संजय चौधरी कळवतात.

कुर्‍हा येथे जयंती उत्साहात
कुर्‍हाकाकोडा-
बेटी बचाव बेटी पढाव अभियानाचे राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्र फडके यांच्याहस्ते महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कोरोनाला घाबरून न जाता 45 वयाच्या ज्येष्ठ नागरीकांनी कोरोना लसीकरण करावे तसेच सोशल डिस्टन्स, मास्क, सॅनेटायजरचा वापर करून आपन आपला परीवार, आपले गाव, आपला जिल्हा, आपले राज्य व आपला देश सुरक्षीत ठेवण्याचे त्यांनी केले. या प्रसंगी पंचायत समिती सदस्य राजूभाऊ सावळे, कुलकर्णी, ईतर जेष्ठ नागरीक, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सोनवणे व सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

भुसावळात 19 रोजी रक्तदान शिबिर
भुसावळ :
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 30 व्या जयंती निमित्त तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्था, गोपाल युवा बिग्रेड रक्तदाते व डॉ.बी.आर.आंबेडकर फाऊंडेशन यांच्यावतीने सोमवार, 19 रोजी सकाळी 10 ते दुपारी एक दराम्यान ब्राह्मण संघातील नेत्रम हॉस्पीटलमध्ये नेत्रम रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छूक दात्यांनी रक्तदान करण्यासाठी राजश्री नेवे (9890021889), निलेश फंड (8605060547) व राहुल पांडव (9579321810) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. यावेळी शासनाच्या त्रिसूत्री नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी कळवले आहे.

वंचित बहुजन आघाडी
भुसावळ :
भुसावळात वंचित बहुजन आघाडीतर्फे महामानवास जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीतर्फे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130व्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे जिहाध्यक्ष विनोद सोनवणे, जिल्हा महासचिव दिनेश इखारे, राजू डोंगरदिवे, विद्यासागर खरात, जिल्हा कोषाध्यक्ष अरुण नरवाडे, संतोष कोळी भुसावळ तालुकाध्यक्ष,देवदत्त मकासरे (मेजर), गणेश इंगळे, भीमराव साळुंके, जयराज आव्हाड, तालुका सचिव, दीपक वाघ उपस्थित होते.

रीपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटीक)
भुसावळ “:
रीपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटीक) पक्षातर्फे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला जिल्हाध्यक्ष विजय साळवे यांच्याहस्ते पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच पूजा वंदना करण्यात आली. यावेळी सोशल डिस्टन्सचे पालन करण्यात आले. रीपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटीक) पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय बाबूराव साळवे, जिल्हा सरचिटणीस सुरेश जोहरे, सुनील बाबूराव जोहरे, सत्यसिंग लोंढे, कमलेश साळवे, नितीन साळवे, सत्यवान निकम, महेंद्र तपासे आदी उपस्थित होते.