ज्ञानेश्‍वर मोकाशी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

0

चाकण : कान्हेवाडी तर्फे चाकण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे उप शिक्षक ज्ञानेश्‍वर मोकाशी यांना खेड पंचायत समितीच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

पंचायत समिती तर्फे आदर्श शिक्षक म्हणून आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन मोकाशी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सभापती सुभद्राताई शिन्दे, उपसभापती अमोल पवार, जि.प. सदस्य रुपाली कड, पं.स. सदस्य वैशाली जाधव, गटविकास आधिकारी इंदीरा अस्वार, गट शिक्षणाधिकारी सोपानराव वेताळ, युवा नेते लक्ष्मण जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. मोकाशी यांचे कान्हेवाडीच्या सरपंच शांता येवले, माजी सरपंच भाऊसाहेब पवार, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व शिक्षक वृंद, सर्व विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती यांच्या वतीने अभिनंदन करून नागरी सत्कार करण्यात आला.