ज्ञानेश्‍वर मोरघाने जिंकली 10 कि.मी. अंतराची पहिली आय रन स्पर्धा

0

ठाणे। भारतीय नेत्र पेढी संघटना (आय बँक असोसिएशन ऑफ इंडिया) आणि शेठ समूह आयोजित पहिल्या आय रन स्पर्धेतील 10 किलोमीटर अंतराची स्पर्धा जिंकत पालघरच्या ज्ञानेश्‍वर मोरघाने अवघ्या तीन आठवड्यांच्या कालावधीत सलग तिसरी स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. महिलांमध्ये आरती पाटीलने बाजी मारली. स्वातंत्र्यदिनी आयोजित केलेल्या पहिल्याच आय रन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठाणे आणि मुंबई येथील 1500 धावपटूं या स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेतून मिळालेला निधी अंध गरजू व्यक्तींच्या नेत्र चिकित्सा व नेत्र शस्त्रक्रिया करण्याच्या उदात्त हेतूसाठी वापरला जाईल. शेठ समूह आयोजित या स्पर्धेत सहभागी झालेल्या धावपटूंनी नेत्रदान करण्याचा संकल्प सोडला. या स्पर्धेचे उद्घाटन अंकुर धर्मा (22 वर्षांचा अनुभव असलेले पॅरालिंपिक खेळाडू व भारताचे प्रतिनिधित्व करणारे पहिले अंध खेळाडू) यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना शेठ ग्रुपचे संचालक मौलिक शेठ म्हणाले की, हा आम्हा सर्वांसाठी एक प्रेरणादायी, रोमांचक अनुभव होता. कित्येक महिन्यांचे नियोजन आणि मेहनत यामुळेच ही स्पर्धा यशस्वी झाली. आम्हाला भारतीय नेत्र पेढी संघटना (आय बँक असोसिएशन ऑफ इंडिया) यांच्याशी भागीदारी केल्याने अतिशय आनंद होतो आहे.
विजेत्यांची नावे : पुरुष: 10 कि .मी : ज्ञानेश्‍वर मोरघा (31:38 मिनिटे ), अमित माळी (31:46 मिनीटे), पिंटू कुमार (32:49 मिनिटे) .

5 कि .मी : दिनेश म्हात्रे (18:12 मिनिटे ), रोहिदास
(18:13 मिनिटे ) उदय सिंग (18:17 मिनिटे)

महिला: 10 कि.मी.: आरती पाटील (38:40 मिनिटे), रिशू सिंग (38:53मिनिटे ), गीता वाटगुरे (39:14 मिनिटे)

5 किमी: ऐश्वर्या मिश्रा (23:04 मिनिटे ), कविता भोईर
(23:58 मिनिटे ), ओमिगा कोळी (24:40 मिनिटे)