आळंदीः श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर या शाळेच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सरला न्हावले यांनी सेवापुर्ती कृतज्ञता सत्कार सोहळ्यात शाळेच्या मुख्याध्यापक कक्षासाठी 1 लाख 51 हजार रुपये देणगी दिली. यावेळी कक्षाचे कोनशिला अनावरण उत्साहात झाले. अध्यक्षस्थानी सरचिटणीस जय भगवान ह.भ.प. अश्विनी इप्पर होत्या. या प्रसंगी सभापती पंचायत समिती हवेली हेमलता काळोखे, संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, सचिव अजित वडगावकर, खजिनदार डॉ.दिपक पाटील, विश्वस्त प्रकाश काळे, प्राचार्य गोविंद यादव, मुख्याध्यापक प्रदीप काळे, पर्यवेक्षक दीपक मुंगसे, सुर्यकांत मुंगसे, किसन राठोड, शिक्षक प्रतिनिधी संजय उदमले, शिक्षकेतर प्रतिनिधी बाळासाहेब भोसले, माजी नगरसेवक नंदकुमार कुर्हाडे उपस्थित होते. ज्ञानेश्वर शिक्षण संस्था, श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्यु.कॉलेज, श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर, महर्षी वाल्मिकी विद्यावर्धिनी तसेच विद्यर्थी, हितचिंतक यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
जबाबदारी पार पाडली
सरला न्हावले म्हणाल्या की, माऊलींच्या भूमीत ज्ञानदान करण्याचे कार्य हातून घडले. माझ्या या कार्याला सासरची, माहेरची, संस्थेची व माझ्या शिक्षक सहकार्यांची साथ मिळाली. मी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून कुटुंब व शाळेतील जबाबदार्या यशस्वीरित्या पार पाडू शकले. ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सासू निर्मला न्हावले व सासरे निवृत्ती न्हावले यांची मोलाची साथ लाभली. त्यांच्या स्मरणार्थ मुख्याध्यापक कक्षासाठी 1लाख 51हजार रुपयांची देणगी त्यांनी दिली. प्रास्ताविक संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांनी केले. सूत्रसंचालन पर्यवेक्षक सुर्यकांत मुंगसे यांनी केले. आभार मुख्याध्यापक गोविंद यादव यांनी मानले.