ज्ञानेश्‍वर विद्यालयात स्वच्छता अभियान

0
आळंदी : श्री ज्ञानेश्‍वर विद्यालय व ज्यु.कॉलेज विद्यालयात स्वच्छता पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. या स्वच्छता अभियानामध्ये येथील स्वकं सेवा मंडळाचे संस्थापक डॉ.सारंग जोशी यांचे स्वच्छता विषयावर जनजागृती करणारे मार्गदर्शक व्याख्यान उत्साहात झाले. यावेळी अध्यक्षस्थानी स्वकामचे अध्यक्ष सुनील तापकीर होते. प्रमुख अतिथी मृदुला जोशी, संतोष आंबेकर, सुभाष बोराटे, ज्ञानेश्‍वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगांवकर, मुख्याध्यापक गोविंद यादव, पर्यवेक्षक, शिक्षक मुले आदी उपस्थित होते.
यावेळी व्याख्याते डॉ.सारंग जोशी म्हणाले की, स्वकामचे ईवलेसे रोप लावियेले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी या उक्तीप्रमाणे सन 1996 मध्ये आई, मुलगी व शेजारी यांना बरोबर घेऊन आळंदीत स्वच्छता उपक्रमास सुरुवात केली. सोडा अहंकार मिळवा आनंद या विचाराने व स्वच्छतेच्या ध्येयाने प्रेरित झालो. 1300 स्वयंसेवक आता निरपेक्ष भावनेने राज्यातील आळंदी, पंढरपूर, देहू, भीमाशंकर अशा धार्मिक ठिकाणी स्वखर्चाने स्वच्छतेचे कार्य करीत आहेत. डॉ.जोशी यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व सांगत शाळेस स्वच्छतेचे साहित्य भेट देऊन स्वच्छता उपक्रमात सहभाग घेतला. माजी अध्यक्ष सुरेश वडगांवकर यांनी मुलांना डॉ.सारंग जोशी व त्यांचे सहकारी यांचे स्वकाम सेवेचे कार्य इतरांना प्रेरणादायी आहे. यातून इतरांनी आदर्श घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. संतोष आंबेकर यांनी स्वच्छतेवर यावेळी मार्गदर्शन केले. सुत्रसंचलन सुर्यकांत खुडे व सुदाम मोहरे यांनी केले. प्राचार्य गोविंद यादव यांनी आभार मानले.