ज्ञान रचनावादी अध्यापनातून घडेल महाराष्ट्र

0

पहूर । ज्ञान रचनावादी अध्यापन पद्धतीतून उद्याचा प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडेल, असा आशावाद जळगाव येथील जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या (डायट)च्या अधिव्याख्यात्या प्रा.एम.एस. क्षिरसागर यांनी व्यक्त केला. त्या पहूर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विदयालयात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियानांतर्गत सूरू असलेल्या पायाभूत व नैदानिक चाचणीच्या पर्यवेक्षणाप्रसंगी बोलत होत्या. प्रारंभी शाळेतर्फे मुख्याध्यापिका वैशाली घोंगडे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी शिक्षकांनी कृतीयूक्त अध्यापन पद्धतीचा वापर करण्याचे आवाहन केले. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विदयार्थी या वेळी उपस्थित होते. शंकर भामेरे यांनी सूत्रसंचलन केले व आभार मानले. याप्रसंगी त्यांनी विदयार्थ्यांशी संवाद साधून प्रेरणादायी मार्गदर्शन केले.