ज्यांना देशात असुरक्षित वाटते त्यांना बॉम्बने उडविले पाहिजे; भाजप आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य

0

लखनऊः भारतात राहणे असुरक्षित वाटते असे म्हणणाऱ्यांना बॉम्बने उडवून दिले पाहिजे, असे वादग्रस्त वक्तव्य उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरमधील एका भाजपा आमदाराने केले आहे. आमदार विक्रम सैनी असे भाजप आमदाराचे नाव आहे.

हे माझं वैयक्तिक मत आहे, पक्षाचा याच्याशी काहीही संबंध नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. माझ्याकडे एखादे मंत्रालय दिल्यास अशा सर्वच माणसांना मी बॉम्बने उडवून देईन. कोणालाही सोडणार नाही असे ते म्हणाले.

गेल्या काही दिवसांपूर्वीच अभिनेते नसिरुद्दीन शाह म्हणाले होते की, देशातील मुलांच्या मनात असुरक्षिततेची भावना आहे. बुलंदशहरमध्ये कथित गोहत्येच्या प्रकरणात हिसेंमध्ये पोलीस इन्स्पेक्टर सुबोध कुमार सिंह यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या प्रकरणावरून मोठं वादंग निर्माण झाले होते. मी पण देशभक्त आहे. पण मला गोंधळ घालण्याची गरज वाटत नाही, असे शहांनी म्हटले होते.